एकटे अश्लील फाेटाे किंवा व्हिडिओ पाहात असाल, तर ही बातमी एकदा वाचाच. एखादी व्यक्ती एकटी एकांतात अश्लील फाेटाे किंवा व्हिडिओ पाहण्यावर केरळ उच्च न्यायालयाने माेठा निर्णय दिला आहे. एकांतात अश्लील फाेटाे किंवा व्हिडिओ पाहणे हा भारतीय दंड विधान कमल 292 अंतर्गत गुन्हा ठरत नाही. मात्र आराेपीने अश्लील फाेटाे किंवा व्हिडिओ प्रसारित केल्यास किंवा सार्वजनिक केल्यास ताे गुन्हा ठरताे, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या निकालमागची पार्श्वभूमी अशी की, याचिकाकर्ता हा फाैजदारी खटल्यात एकमेव आराेपी आहे. ताे रस्त्याच्या कडेला एकटा उभा राहून माेबाईल फाेनवर अश्लील व्हिडिओ पाहत हाेता. मात्र याचिकाकर्त्याने ते व्हिडिओ किंवा फाेटाे सार्वजनिक केले नव्हते. तसा आराेप देखील नव्हता. याचिकेकर्त्यावर फाैजदारी खटला दाखल करण्यात आला हाेता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाविराेधात याचिकाकर्त्याने ही याचिका दाखल केली हाेती.
यावर केरळ उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. पाेर्नाेग्राफी अनेक शतकांपासून प्रचलित आहे. नवीन डिजिटल युगाने ते पूर्वीपेक्षा अधिक सुलभ केली आहे. अनेकांच्या अक्षरशः बाेटावर ही उपलब्ध झाली आहे. या प्रकरणात एखादी व्यक्ती त्याच्या खासगी वेळेत इतरांना न दाखवता पाॅर्न व्हिडिओ पाहत असेल, तर हा गुन्हा ठरताे का?
उपस्थित झालेल्या या प्रश्नावर न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन म्हणाले, “मी आपल्या देशातील अल्पवयीन मुलांच्या पालकांना आठवण करून दिली पाहिजे. पाेर्नाेग्राफी पाहणे हा कदाचिक गुन्हा असून, शकत नाही”. पण जर अल्पवयीन मुलांनी पाॅर्न व्हिडिओ पाहण्यास सुरूवात केली, जी आता सर्व माेबाईल फाेनवर उपलब्ध आहेत, तर त्याचे दूरगामी परिणाम हाेतील, असेही ते म्हणाले.