“रिपब्लिकन शक्ती एकत्र येण्याची हीच योग्य वेळ व काळाची गरज आहे. रिपाई शक्तीने पुन्हा चार खासदार निवडून आणता येतील. एकत्र येण्यासाठी चांगले वातावरण आहे. रिपब्लिकन ऐक्यानंतर नेतृत्व कोणीही करा, मात्र एकत्र या! दुसऱ्यांची गरज भासणार नाही”, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी केले. तर अमरावतीत रिपाई स्वतःच्या चिन्हावर जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीने जागा न दिल्यास स्वबळाचा नारा दिला जाणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी रविवारी अहमदनगर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात बैठक घेवून संवाद साधला. रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्यांक आघाडीचे गुलाम शेख, सचिन शिंदे, नईम शेख, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, निजाम शेख, जमीर सय्यद, जमीर इनामदार, आवेज काझी, सुफियान काझी, रवी कानडे, अजीम खान, बंटी बागवान, जावेद सय्यद, प्रकाश भटेजा, आदिल शेख, सोहेल शेख, अरबाज शेख, हुसेन चौधरी, उमेश गायकवाड, ज्योती पवार, संपदा म्हस्के, पूजा साठे आदी उपस्थित होते.
राजेंद्र गवई म्हणाले, “अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसने जाहीर केली. ही जागा त्यांच्या कोट्यात येते का नाही? ते देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात निवडणुकीला व निवडून येण्यासाठी रिपाई लागते. मात्र त्यांना जागा दिली जात नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. रिपाईला अमरावतीमध्ये जागा न मिळाल्यास महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांनी महाविकास आघाडीला जागा दाखविण्याचे त्यांनी आवाहन केले”. काँग्रेस पक्ष रिपाईची शक्ती कमी करत असल्याचा आरोप करुन, मित्र पक्षाला कमकुवत केल्यामुळेच काँग्रेसची दशा झाल्याचे त्यांनी सांगितले.
सुशांत म्हस्के यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गवई यांच्या भूमिका व निर्णयाला सर्व भीमसैनिकांचा पाठिंबा राहणार आहे. त्यांनी योग्य निर्णय घेवून कार्यकर्त्यांना आदेश द्यावे. जिल्ह्यात देखील रिपाईच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे कार्य उत्तमपणे सुरु असून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युवकांचे उत्तमप्रकारे संघटन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.