“केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा वापर वापर वेगळ्याच कारणासाठी करत आहेत. अनिल देशमुख यांच्यावर खटला दाखल करत 14 महिने तुरुंगात ठेवले. सामनाचे संपादक संजय राऊत लिहितात, टीका करतात म्हणून त्यांना आत टाकले. नवाब मलिक केंद्र सरकारविराेधात बाेलतात आणि टीका करतात म्हणून त्यांना आत टाकले. मात्र ‘ईडी’ची नाेटीस येताच काहींनी भूमिका बदलली. समाेरे जातील, असे वाटले. परंतु धाडस दाखविण्याएेवजी भाजपबराेबर जाणे पसंद केले”, असा टाेला शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली. काेल्हापूर इथं झालेल्या सभेत शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविराेधात चांगलीच टाेलेबाजी केली.
शरद पवार म्हणाले, “मला विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘ईडी’ची नाेटीस आली. मला म्हणाले उद्या यायचे आहे. मी म्हणालाे, आताच येताे. यावर पाेलिस घरी आले आणि हात जाेडून उभे राहिले. मी ज्या बॅंकेतून कर्ज घेतले नाही, त्यासंदर्भात ही नाेटीस हाेती. केवळ हे भीती घालतात. सत्याची भूमिका असल्यावर काेणालाही घाबरायचे नाही”. मात्र इथं काेल्हापूरला एक नाेटीस आली आणि भूमिकाच बदलली. घरातील महिलांनी सांगितले आमच्यावर अन्याय करताय, आम्हाला गाेळ्या घाला. मात्र हे धाडस घरच्या प्रमुखांनी दाखवले नाही. भाजपसाेबत जाणे पसंद केले, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी काेल्हापूरच्या सभेत शेतकऱ्यांच्या समस्या, महागाई, तरुणांच्या बेकारीचा प्रश्न यासह मणिपूरचा प्रश्न आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा मुद्यावर जाेरदार भाष्य केले. मणिपूर मध्ये झालेल्या घटनेबद्दल सरकार चर्चा करायला तयार नाही. महिलांचे संरक्षण करायला सरकार तयार नाही, अशा सरकरला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी केलेल्या टीकेवर हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्यासोबतचे मंत्री काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.