“‘अजित पवार आमचेच’, असे मी म्हणालाे नाही, असे सांगून अजित पवार यांना पुन्हा संधी देणार नाही आणि तशी त्यांनी मागू नये”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी ‘अजित पवार आमचेच’, असे विधान केले हाेते. त्यावर त्यांनी आता घुमजाव केले आहे. शरद पवार हे काेल्हापूर इथं आहेत. त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेले नाही. काही लाेकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी पक्ष साेडला आहे. पक्ष साेडणे म्हणजे पक्ष फूट नव्हे. ‘अजित पवार यांना आमचे नेते’, असे मी म्हणालाेच नाही. खासदार सुप्रिय सुळे तशा म्हणू शकतात. मी नाही”. आता अजित पवारांना पुन्हा संधी नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर त्यांना संधी दिली हाेती. आता नाही. अजित पवारांनी वेगळी भूमिका आहे. पक्ष फुटलेला नाही, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी बारामतीमधून निघताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाला सुसंगत, असे विधान करत ‘अजित पवार आमचेच नेते, असे म्हटले हाेते. यावर शरद पवार यांनी घूमजाव केले आहे. शरद पवार यांच्या सुरूवातीच्या विधानामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. भाजप, काॅंग्रेस आणि शिंदे आणि ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या हाेत्या. भाजपने शरद पवार आणि सुप्रिया सुळे आमच्या बराेबर येतील, असा दावा करण्यास सुरूवात केली हाेती. यातच शरद पवार हे अजित पवार यांच्या विधानावर घुमजाव केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. ‘मी आज यावर काहीच बाेलणार नाही’, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.