‘अजित पवार आमचेच नेते आहे, ते भाजपसाेबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असे हाेत नाही’, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारण खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापुढची माेठी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर ‘शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील लवकरच माेदी सरकारला पाठिंबा देतील’, असा दावा केला आहे.
बावनकुळे म्हणाले, “वर्षभरात माेदी सरकारने विश्वकर्मा याेजना, ओबीसी घटकांकरिता याेजनांवर काम सुरू केले आहे. गेल्या नऊ वर्षात जे निर्णय घेतले गेले नाही, ते निर्णय आम्ही वर्षभरात घेणार आहे”. केंद्र सरकारचे काम पाहून शरद पवारांचे मत आणि मनपरिवर्तन हाेत आहे. अजित पवारांप्रमाणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे माेदींच्या नेतृत्वाला मदत करतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
‘शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आगामी काळात सत्तेत असणार आहेत’, असे वक्तव्य भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी केले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे लवकरच मनपरिवर्तन हाेईल, अशी खात्री आहे. आज जरी शरद पवार म्हणत असतील की भाजपसोबत जाणार नाही, मात्र येणारा काळ्यात ते भाजपसाेबत असली, असेही उपाध्ये म्हणाले.