भारतीय जनता पक्षाच्या विराेधात असलेल्या ‘इंडिया’ आघाडी अधिकच घट्ट हाेताना दिसत आहे. मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची 31 ऑगस्टला बैठक हाेत आहे. या बैठकीत आघाडीचा लाेगाे अनावरण हाेणार असल्याचे निश्चित झाले आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या लाेगाेसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले हाेते. त्यापैकी एका डिझाईनवर शिक्कामाेर्तब करण्यात आला आहे.
‘इंडिया’ आघाडीची ही तिसरी बैठक आहे. ती मुंबईत हाेत आहे. यातच ‘इंडिया’ आघाडीचा लाेगाे अनावरण हाेणार आहे. यावरून ‘इंडिया’ आघाडीने महाराष्ट्रावर अधिक फाेकस केल्याचे दिसते आहे. ‘इंडिया’ आघाडीचा लाेगाे कसा असले, याची उत्सुकता आता समर्थकांना लागली आहे. या लाेगाेला ‘इंडिया’ आघाडीमधील बहुतांश पक्षांनी संमती दिली आहे.
या लाेगाेचे अनावरण 31 ऑगस्टला हाेत असलेल्या रात्रीच्या बैठकीत हाेणार आहे. या आघाडीला ‘इंडिया’ नाव आल्याने या लोगोमध्ये भारतीय राष्ट्रध्वज अर्थात तिरंग्याची झलक दिसणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्षांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीत त्या त्या पक्षाचा प्रत्येकी एक प्रमुख नेता हा समितीचा सदस्य असेल. ‘इंडिया’ आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.
या बैठकीत सुरूवातीला लाेकसभा निवडणुकीच्या संदर्भात ‘इंडिया’ आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा हाेणार आहे. तसेच या बैठकीत एकूण सहा मुद्यांवर चर्चा हाेईल. हे मुद्दे राष्ट्रीय अजेंडाशी निगडीत असणार आहे. ‘इंडिया’ आघाडीचा जाहीरनामा नसेल, परंतु राष्ट्रीय पातळीवरील सहा मुद्यांवर ‘इंडिया’ आघाडी आहे, त्यावर चर्चा हाेईल. 31 तारखेला हाेत असलेल्या बैठकीला मराठमाेळ्या जेवणाची रेलचेल असणार आहे. पुरणपोळी, वडापाव, झुणका भाकर आदी महाराष्ट्रातील व्यंजन जेवणात असतील. ढोलताशा, लेझीम या पारंपरिक पद्धतीने नेत्यांचे स्वागत होणार आहे.