उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माेठी घाेषणा केली आहे. बदलत्या काळात महिलांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नवं महिला धाेरण आणणार आहे, अशी घाेषणा अजित पवार यांनी केली आहे. याबाबत महत्त्वाची बैठक झाली असून, या नवीन महिला धाेरणाची जबाबदारी मंत्री आदिती तटकरे यांच्यावर साेपवण्यात आली आहे.
अजित पवार म्हणाले, “राज्यात पहिले महिला धाेरण 1994 साली आले. यानंतर दुसरे 2001 मध्ये आले. तिसरे 2014 आले. आता चाैथे धाेरण 2023 मध्ये आणताेय”. या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आहेत. या धाेरणासंदर्भात सर्व महिलांशी चर्चा करण्याचे सुचवले आहे. यामध्ये वेगवेगळ्या महिला संघटनांशी, सहकारी महिलांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला हाेता. जवळपास एक लाख जणांनी इथं मते मांडली आहेत, असे अजित पवार म्हणाले. हे धाेरण आणण्यात आम्हाला काहीसा वेळ लागला असेही अजित पवार म्हणाले.
आदिती तटकरे यांना महिलांच्या प्रश्नांची जाण आहे. चाैथे महिला धाेरण अतिशय विचारपूर्वक या पुराेगामी राज्यात आणण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. याचे प्रेझेंटेशन मुख्यमंत्री आणि मला त्या विभागाने दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.