महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आणि विनाेदवीर समीर चाैघुले यांची इन्स्टाग्रामची एक पाेस्ट सध्या चर्चेत आहे. 14 ऑगस्टपासून एमएचजे (MHJ) चे नवे पर्व सुरू झाले आहे. या पर्वामध्ये एक नवीन अभिनेता येत आहे, असे समीर चाैघुले यांची ही पाेस्ट आहे. ही पाेस्ट शेअर करतान समीर चाैघुले यांनी कमेंट केली आहे. त्यामुळे ही पाेस्ट अधिक चर्चेत आली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांचे मनाेरंजन करत आहे. दाेन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा साेमी मराठीवर सुरू झाला आहे. रात्री नऊ वाजता साेमवार ते गुरूवारपर्यंत हा कार्यक्रम येताे.
समीर चाैघुले यांनी पाेस्टमध्ये ‘आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेता पदार्पण करताेय, असे म्हटले आहे. यासाठी #newentry #debut असे हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत. या पोस्टवर MHJ ची ‘लॉली’ नम्रता संभेराव हिने देखील खास कमेंट केली आहे. ‘समीर चौघुले यांनी दिली आनंदाची बातमी, त्यांच्याकडे झाले नव्या पाहुण्याचे आगमन! मुखडा पाहून व्हाल थक्क’, असे संभेराव हिने म्हटले आहे.
समीर यांच्या फोटोवर अनेक कमेंट आहेत. मात्र नम्रताची कमेंट विशेष चर्चेत आली आहे. समीर यांच्यासोबत फोटोमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरे आहे. गौरव हा महाराष्ट्राची हास्यजत्रेचा महत्त्वाचा भाग आहे. तरी देखील समीरने त्याला ‘नवीन अभिनेता’ म्हटले आहे. MHJ चा हा नवीन सिझन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच गाैरव माेरे याने केस कापले आहेत.
गाैरव माेरे याची मानेपर्यंत वाढवलेले केस ही खास ओळख. तो जेव्हा ‘आय-एम-ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असे म्हणत एन्ट्री घ्यायचा, तेव्हा ती एन्ट्री त्याच्या केसांच्या स्टाइलमुळेच हिट ठरायची. गाैरव माेरे याच्या केसाचे सई ताम्हणकर ही देखील काैतुक केले आहे. आता गौरवने त्याचे केसच कापून टाकल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. तसा काहींना धक्का देखील बसला आहे. गौरवचा बदललेला लूक त्याच्या अनेक चाहत्यांना नकाेसा झालाय.