महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे बडे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थाेरात यांना काॅंग्रेस कार्यकारिणीत वगळण्यात आले आहे. काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 39 सदस्यांची यादी जाहीर केली आहे. यात बाळासाहेब थाेरात यांना वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.
राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्णय प्रक्रियेतील सर्वाेच्च मानली जाणारी काॅंग्रेस कार्यकारी समितीची घाेषणा केली. या मुख्य समितीत 39 जणांचा समावेश आहे. कायमस्वरूपी निमंत्रित, विशेष निमंत्रित आणि राज्य प्रभारी अशा 45 जणांचा समितीत समावेश आहे. कार्यकारी समितीत साेनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना कायम ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान डाॅ. मनमाेहन सिंग, माजी मंत्री ए. के. ऍण्टोनी, लाेकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार यांच्यासह पी. चिदम्बरम, अंबिका साेनी, दिग्विजय सिंह, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, तारिक अन्वर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी संधी देण्यात आली आहे. मुकूल वासनिक आणि अविनाश पांडे या राज्यातील नेत्यांना कायम ठेवण्यात आले आहे. माजी मंत्री चंद्रकांत हंडाेरे यांना कायमस्वरूपी निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. माणिकराव ठाकरे, यशाेमती ठाकूर, प्रणित शिंदे आणि रजनी पाटील निमंत्रित म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र बडे नेते बाळासाहेब थाेरात यांना वगळण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांना वगळण्यात आले आहे. कर्नाटक मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने त्यांना महाराष्ट्र प्रभारी पदातून मुक्त करण्यात आले आहे. लवकरच महाराष्ट्राला प्रभारीची नियुक्ती केली जाणार आहे.
तसेच गेल्या वर्षी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांच्याविराेधात थिरुअनंतपूरचे खासदार शशी थरूर यांनी निवडणूक लढवली हाेती. त्यांना कार्यकारी समितीत समावेश करण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष पदाची निवडणुकीच्या मागणीसाठी ज्या 23 जणांनी पत्र दिले हाेते. त्यातील यात शशी थरूर हे देखील हाेत्या. त्यांच्याबराेबर मुकूल वासनिक, तरुण गाेगाई, आनंद शर्मा, वीरप्पा माेईली आणि मनीष तिवारी या नेत्यांना मुख्य समितीत स्थान देण्यात आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, पश्चिम बंगालच्या प्रिया दासमुन्शी, छत्तीसगडचे साहू आणि राजस्थानचे सचिन पायलट, महेंद्रसिंग मालविया यांचा कार्यकारीमध्ये समावेश करण्यात आला आहे.