महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगाने उलथापालथ हाेत आहे. कधी काय हाेईल, हे सांगता येत नाही. शिवसेनेपाठाेपाठ राष्ट्रवादीमध्ये बंडाळी झाली. हे बंडखाेर आता भाजपबराेबर राज्याच्या सत्तेत आहेत. आता काॅंग्रेसमधील माेठा गट फुटणार असून, ताे महायुतीत सहभागी हाेईल, असे सांगितले जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला आहे.
खासदार जाधव म्हणाले, “राज्यातील सत्ताबदल वेगाने हाेत आहे. आणखी एक राजकीय भूकंप हाेणार आहे. महाराष्ट्रातील काॅंग्रेस पक्षाचा माेठा गट महायुतीत सामील हाेणार आहे”. काॅंग्रेसने वरिष्ठ लाेकांना डावलून विजय वडेट्टीवार यांना विराेधी पक्षनेतेपद दिले आहे. त्यामुळे काॅंग्रेसमधील वरिष्ठ अतिशय अस्वस्थ आहेत. हे अस्वस्थ आहेत, त्यांची नावे घेण्याची गरज नाही. हेच अस्वस्थ नेते निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, असे प्रतापराव जाधव म्हणाले.
प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारण चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी काॅंग्रेसबाबत अशाच चर्चा हाेत्या. त्यामुळे राज्याच्या राजकारण पुन्हा एकदा पक्ष फुटीच्या चर्चां रंगल्या हाेत्या. त्यामुळे राजकारणात नेमके कधी काय हाेईल, हे सांगता येणार नाही. यातच काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 39 सदस्यीय काॅंग्रेस कार्यकारी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील दिग्गज नेते माजी मंत्री बाळासाहेब थाेरात यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पक्ष फुटीच्या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.