मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीतच एकमेकांना भिडल्याची चर्चा रंगली आहे. वेळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने विषय तिथेच थांबल्याचे बाेलले जात आहे. अजित पवार यांच्या थेट प्रश्नाने एकनाथ शिंदे हे त्याच टेचात उत्तर देत असल्याचे समजते. हा तिखट संवाद आता राज्याच्या राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे, असा प्रश्न केल्याच समजते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच पद्धतीने अजित पवार यांना उत्तर देण्यास सुरूवात केली. त्यावेळी बाजूला असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच सावरासावर केली आणि तिथेच विषय थांबवला.
मंत्र्यांची एक खासगी बैठक शुक्रवारी झाली. राज्याच्या विविध प्रश्नांबराेबर शासकीय याेजना आणि आगामी राजकीय विषयांवर चर्चा झाली. यावेळी ठाण्याच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यींचा मुद्दा या बैठकीत अजित पवार यांनी उपस्थित केला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यानंतर पवार यांनी थेट राज्याच्या प्रमुखालाच प्रश्न विचारल्याने बैठकीला उपस्थित असलेले मंत्री अजित पवारांच्या या पवित्र्याने काही काळ आश्चर्यचकित झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती. रुग्णांच्या मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर हाेती? शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण किती याची माहिती देत शिंदे यांनी पवारांच्या प्रश्नांना उत्तर दिल्याचे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाेघांच्या तिखट संवादावर वेळीच हस्तक्षेप करत विषय बदलला. या तिखट संवादाची चर्चा आता रंगली आहे.