राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साथ साेडून गेलेल्या सहकाऱ्यांवर जाेरदार हल्लाबाेल केला आहे. शरद पवार यांनी हा हल्लाबाेल काेणाचेही नाव न घेता केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश साेशल मीडिया विभागाच्यावतीने पुणे येथे आयाेजित साेशल मीडिया मीट अप कार्यक्रात ते बाेलत हाेते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित हाेते.
शरद पवार म्हणाले, “काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आहे. भाजपबराेबर जाऊन बसले आहे. फक्त आत जावे लागेल, ते हाेऊ नये म्हणून हे सहकारी साेडून गेले आहेत. हे सहकारी म्हणतात की आमची वैचारिक भूमिका बदलेली नाही”. याचा अर्थ राजकारणात, समाजकारणात सत्याची साथ साेडून कुणी दमदाटी करत असेल, तर त्या रस्त्याने जायचा निकाल घेतला असेल, तर अशा भेकड प्रवृत्तीला सामान्य लाेक वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांची अडचण झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
‘जे लाेक गेले आहेत, त्याच्यातील बहुतेक लाेकांवर केंद्राने ईडीची चाैकशी या ना त्या करणाने सुरू केली. ईडीची चाैकशी सुरू झाल्यावर काही लाेक त्याला समाेरे जायला तयार नव्हते. म्हणून ते साेडून गेलेत. अनिल देशमुख यांनी देखील बदल करण्यास सांगितले हाेते. त्यांनी स्वीकारला नाही, म्हणून त्यांना 14 महिने तुरुंगात जावे लागले, असे शरद पवार म्हणाले. आता काेणताही प्रश्न आला की भाजपच्या बाजूने बाेलावे लागते. मतदान करावे लागते. ज्यांना भीतीला ताेंड द्यायची तयारी नाही, कारवाईला समाेरे जाण्याची तयारी त्यांनी कारवाईच्या भीतीने रस्ता बदलला आहे’, असे शरद पवार म्हणाले.