शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लाेकसभेच्या 48 मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाचे सत्र सुरू केले आहे. बैठका सुरू केल्या आहेत. अहमदनगर आणि नाशिक लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काेणत्याही परिस्थितीत लढायचे, असे आदेश दिले आहे. विशेष करून महाविकास आघाडीतून वाट्याला येणाऱ्या मतदारासंघात विजय मिळवायचाच, असे त्यांनी म्हटले आहे. यात अहमदनगरमधील मतदारसंघांत महाविकास आघाडीतील काेणत्याही पक्षाला जागा जागाे, तिथे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पराभूत करायचे, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांशी केलेल्या बैठकीत दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी अहमदनगर आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. बूथ रचनेवर काम करून, पक्ष संघटन बळकट करा. काही मदत लागल्यास सांगा. काेणतीही उणिव ठेवू नका. महाविकास आघाडीतून लाेकसभा निवडणुकांना समाेरे जायचे आहे, हे त्यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी सांगितले. लाेकसभा निवडणुकीला समाेरे जाताना महाविकास आघाडीतून किती जागांवर तडजाेड करावी लागले, हे सांगता येणार नाही. परंतु सर्व गाेष्टींची तयारी ठेवा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
अहमदनगर लाेकसभा मतदार संघाबाबत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काेणत्या ही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच आहे. तसा निर्धार उद्धव ठाकरे यांनी माताेश्रीवर पदाधिकाऱ्यांबराेबर झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे. सुजय विखे पाटील यांचा पराभव शक्य आहे. ताे करायचा आहे. त्यासाठी तयारीला लागा, असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेच्या काेणत्या जागा लढवायच्या आहेत, असे पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी विचारणा केली. यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच अहमदनगर लाेकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीतून काेणताही उमेदवार असू, त्याचे काम करायचे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले.