दमदार चित्रपटांमुळे सिनेमागृह प्रेक्षकांच्या गर्दीने फुलली आहे. यातच 12 ते 15 ऑगस्टला लाॅन्ग वीकेंड आला. त्याचा फायदा सिने-निर्मात्यांना झाला आहे. पर्यटनाला जाण्यासह सिनेप्रेमींची पाऊले सिनेमागृहाकडे वळली. सिनेमागृहातील गर्दीने गेल्या 100 वर्षांचा रेकाॅर्ड ब्रेक केलाची बातमी समाेर आली आहे.
रजनीकांत याचा ‘जेलर’, सनी देआेल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’, अक्षय कुमारचा ‘OMG 2’ आणि ‘भाेले शंकर’ हे चित्रपट सिनेमागृहात आहेत. प्रेक्षकांची या चित्रपटांना पसंती मिळत आहे. हे चारही चित्रपट कमाईचा इतिहास रचत आहेत. हे चार सिनेमांनी तीन दिवसांत तीन काेटींपेक्षा अधिक प्रेक्षकांनी पाहिलेत. या सिनेमांची एकत्रित कमाई ही 400 काेटींच्या पुढे गेली आहे.
भारतीय सिनेमांना प्रेक्षकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद ही मनाेरंजनसृष्टीसाठी सुखावणारी बाब आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. “चांगलं कथानक, उत्तम कलाकार अशा सर्व गाेष्टींच्या कलाकृती असल्यामुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहेत. पहाटे शाे देखील हाऊसफुल्ल आहेत. सिनेमांनी हा इतिहास रचला आहे”. 13 ऑगस्ट राेजी या एका दिवसात सगळ्यात जास्त प्रेक्षकांची नाेंद सिनेमागृहात झाल्याचा दावा पीव्हीआर आयनाॅक्सने केला आहे. या दिवशी देशभरातील सर्व सिनेमागृह मिळून तब्बल 13 लाख प्रेक्षकांची नाेंद झाली आहे.