राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाविषयी आणि भाजपविषयी माेठे विधान केले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, “शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर चर्चा सुरू आहेत. अपात्र झाल्यास पुढे काय करायचे. यांच्याकडे दाेनच पर्याय राहताे. ताे म्हणजे एक गट स्थापन करणे आणि दुसरा म्हणजे एखाद्या पक्षात सहभागी हाेणे”. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे भाजपमध्ये जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे मात्र भाजपचीच अडचण हाेणार आहे. भाजपकडून अनेकजण इच्छुक आहे. त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये गेले, तर अपात्रतेची कारवाईपासून वाच शकणार आहेत. त्यांना भाजपात जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पर्याय नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद आहे. ताे शमलेला नाही. केंद्रीय निडवणूक आयाेगने मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असले, असा निर्णय दिलाय. मात्र या निर्णयाविराेधात ठाकरे गटाने सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मूळ पक्षाचे नाव, चिन्ह याबाबत संभ्रम आहे. यातच शिंदे गटाचे आमदार किशाेर पाटील यांनी वेळप्रसंगी आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू, असे सांगून याबाबत सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये काहीशी अस्वस्थता आणि संभ्रम असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.