पुणे मराठी ग्रंथालय यांच्यातर्फे दिला जाणारा हरी गणेश फडके पुरस्काराने यावर्षी अंकिता मोडक हिला देण्यात आला. नाट्य क्षेत्रात कामगिरी असणाऱ्या अहमदनगर मधल्या एका व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी अंकिताची त्यासाठी निवड करण्यात आली.
मुकुंद मराठे यांच्या हस्ते 27 जुलैला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहानपणापासून पासून अंकिता नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. शालेय वयात असतानाच तिने चेरिश थीएटरच्या एकांकिकांचे पार्श्व संगीत केले आणि पार्श्व संगीताची पारितोषिकही मिळवली. ‘डिझाईन लव श्री तशी सौ’, ‘ये ग ये ग सरी’, ‘शापित नात्यांच्या वाटेवर’, ‘खोटं नाटक’, या एकांकिकासाठी आत्तापर्यंत महाड, इचलकरंजी, वाई, परभणी, धुळे, आजगाव दापोली येथे पारितोषिके मिळवलेली आहेत.