वेगळी कथा आणि त्यावर अभियन करण्यात आयुष्मान खुराना ओळखला जाताे. त्याचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट 2019 मध्ये माेठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंतीला पडला. या चित्रपटाचा आता सिक्वेल येत आहे. आयुष्मान याने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ पाेस्ट करत ‘ड्रीम गर्ल 2’ ची घाेषणा केली हाेती. या चित्रपटातील आयुष्यमानचा लूक प्रदर्शित झाला आहे आणि त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.
अभिनेता आयुष्मान याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर केली आहे. यात त्याने ‘ड्रीम गर्ल 2’ मधील आपला लूक शेअर केला आहे. या पाेस्टरमध्ये आयुष्मान आरश्यात बघून लिप्स्टिक लावताना दिसताेय. दुसऱ्या बाजुला डबल राेल पूजा दिसत आहे, तिही लिप्स्टिक लावताना दिसतेय. या पाेस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहेत. तसेच या पाेस्टरवर चाहत्यांची प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.
आयुष्मान याच्या या पाेस्टर त्याच्या पत्नी देखील कमेंट केली आहे. पाेस्टखाली तिने दाेन हार्ट आय इमाेजी शेअर केल्या आहेत. पाेस्टर पाहून आयुष्यमान याचे चाहते त्याचे काैतुक करत आहे.
आयुष्मान याचा ‘ड्रील गर्ल 2’ हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटात आयुष्मानबराेबर अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनाेज जाेशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्याेत सिंह प्रमुख भूमिकेत असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. एकता कपूर चित्रपटाची निर्माता आहे.