व्हॉट्सअॅप हे युजर्समध्ये सर्वाधिक पसंतीचे अॅप आहे. ते दैनंदिन गरज बनली आहे. व्हॉट्सअॅपने आता युजर्सने आणखी एक माेठी अपडेट आणली आहे. व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी नवीन फिचर लाॅंच केले आहे. जे अनाेळखी नंबरसह चॅट करणे साेपे हाेणार आहे.
व्हॉट्सअॅपच्या या फीचर्स नुसार युजर्सना अनाेळखी नंबर सेव्ह न करताच त्यांच्याशी चॅट करता येणार आहे. या अगाेदर तुम्हाला अशाे अनाेळखी नंबरसह चॅट करायचे असल्यास ताे नंबर अगाेदर सेव्ह करावा लागत हाेता. मात्र आताच्या फिचरनुसार कंपनी नंबर सेव्ह करण्याची आवश्यकता भासणार नाही.
व्हॉट्सअॅपने नंबर सेव्ह करण्याची आवश्यकता बंद करून या प्रक्रियेला अधिक साेपी केली आहे. WABetaInfo द्वारे हे नवीन फिचर सुरू केले जात आहे आणि iOS आणि अँड्रॉइडवर व्हॉट्सअॅपच्या व्हर्जनसह युजर्सना लवकरच उपलब्ध हाेणार आहे. या नवीन फिचरमुळे आता कोणत्याही अनोळखी नंबरशी तो नंबर सेव्ह न करता चॅट सुरू करता येणार आहे.
व्हॉट्सअॅपने हे फिचरची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र अॅपस्टोअर किंवा गुगल-प्ले स्टोअरवर WhatsApp च्या नवीन व्हर्जन अपडेट करून हे फिचर घेऊ शकता. हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही. त्यामुळे ते हळूहळू सर्वांसाठी रोलआऊट होण्याची शक्यता आहे.