नीती आयाेगाने राष्ट्रीय बहूआयामी दारिद्रय निर्देशांक प्रगती समीक्षण अहवाल जाहीर केला आहे. देशातले सुमारे साडे तेरा काेटी लाेक बहूआयामी दारिद्य्रातून बाहेर पडल्याची माहिती नीती आयाेगाने दिली आहे. नीती आयाेगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांनी ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.
नीती आयोगाने राष्ट्रीय बहूआयामी दारिद्रय निर्देशांक प्रगती समीक्षण अहवाल 2023 प्रकाशित केला आहे. निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी हे देखील यावेळी उपस्थित होते. हा अहवाल प्रसिद्ध करताना नीती आयाेगाने 2015-16 ते 2019-21 या दरम्यानचे निरीक्षण नाेंदवले आहे.
नीती आयाेगाने 2015-16 ते 2019-21 या दरम्यान देशातल्या दारिद्रयात जगणाऱ्या व्यक्तींची संख्या 24.85 शतांश टक्क्यावरून घसरून 14.96 शतांश टक्क्यांवर आल्याचे म्हटले आहे. याच कालावधीत ग्रामीण भागातही दारिद्रयाचे प्रमाण 32.59 टक्क्यांवरून घसरून 19.28 शतांश टक्के झाल्याचे म्हटले आहे.
2030 पर्यंत शाश्वत विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट भारत आधीच पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात गेल्या नऊ वर्षात अनेक सकारात्मक बदल घडले असल्याचे नीती आयाेगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.