अभिनेता अक्षय कुमार याचा ‘OMG 2’ ऑगस्टच्या 11 तारखेला प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार याच्याबराेबर पंकज त्रिपाठी आणि यामी गाैतमी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे. परंतु हा चित्रपटा आता सेन्साॅर बाेर्डाच्या कचाट्यात सापडला आहे.
‘OMG 2’ चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्याची जाेरदार चर्चा आहे. या चित्रपटातील संवाद आणि काही सीन वादात सापडले आहेत. त्यामुळे चित्रपट पुन्हा रिव्ह्यू कमिटीकडे गेला असून, प्रदर्शनाची तारीख देखील याचा परिणाम हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अक्षय कुमार या चित्रपटात शंकराच्या भूमिकेत आहे. भगवान शंकर रेल्वेच्या पाण्याने रुद्राभिषेक करतानाचा एक सीन यात आहे. हा सीन वादात अडकला आहे. यावर आक्षेप घेतला जात आहे. ‘OMG’ 2012 मध्ये प्रदर्शित झाला हाेता. त्यावेळी परेश रावल यांनी नास्तिकाची भूमिका साकारली हाेती. आता ‘OMG 2’ हा याच चित्रपटाचा सिक्वल आहे. या सिक्वलमध्ये परेश रावल दिसणार नाहीत. परेश रावल यांनी काही महिन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत ‘OMG 2’ ची कथा आवडली नसल्याचे सांगितले हाेते.
‘OMG 2’ चित्रपटात अक्षय कुमार भगवान शंकराच्या रुपात दिसणार आहे. तर अरुण गोविल यात श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेते अरुण गोविल पुन्हा एकदा श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.