मध्यंतरी अनेक चित्रपटांच्या अपयशानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांसमाेर येत आहे. पहिल्या ‘ओह माय गाॅड’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. यानंतर आता अक्षय कुमारचा ‘ओह माय गाॅड 2’ हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित हाेत आहे. ‘ओह माय गाॅड’ पहिला भाग सुपरहिट ठरला हाेता. यानंतर निर्मात्याने त्याचा सिक्वेल काढला आहे.
या चित्रपटातील अक्षय कुमार याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यानंतर अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. याचबराेबर त्याने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अक्षयने व्हिडिओ शेअर करताच त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स सुरू झाल्या आहेत. या कमेंट्स लक्ष वेधून घेत आहेत. हा चित्रपट हिंदू धर्माचा अनादर करणार नाही, अशा प्रकारच्या या कमेंट्स आहेत.
अक्षय कुमारच्या लूकवर कमेंट न करता नेटकऱ्यांनी त्याला हिंदू धर्माचा अनादर करू नकाेस, असे सांगितले आहे. याशिवाय अक्षक कुमार याला काही नेटकऱ्यांनी सुनावले देखील आहे. की ताे सर्वच चित्रपटांमध्ये एकसारखे एक्सप्रेशन देताे म्हणून. बाॅलिवूड कलाकर कायम हिंदू देवतांचा अपमान करत आला आहे. यावेळी अक्षय कुमारकडून असे काही हाेणार नाही, अशी अपेक्षी देखील नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘ओह माय गाॅड 2’ या चित्रपटात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याचं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे.