‘आदिपुरूष’ चित्रपटाने जगभरातून तिसर्या दिवशी 340 काेटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक ट्राेल झालेला चित्रपट आहे. या चित्रपटावरील संवादावर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. साेशल मीडियावर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. संवादामुळे हिंदूंच्या भावना दुखविण्याचा प्रकार आहे. यातून चित्रपटाचे संवाद लेखकांना धमक्या दिल्या गेल्या आहे. यामुळे संवाद लेखकाने मुंबई पाेलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
हिंदूत्ववादी संघटना या चित्रपटाला विराेध सुरू केला आहे. मुंबईतील शाे बंद केल्याने पुन्हा हा चित्रपट चर्चेत आला आहे. ‘आदिपुरूष’ चित्रपटाभाेवती गदाराेळ सुरू असतानाच कालीचरण महाराज यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया साेशल मीडियावर वेगाने व्हायरल हाेत आहे.
कालीचरण महाराज म्हणाले, “आदिपुरूष हा चित्रपट मी पाहिलेला नाही. परंतु त्यावर हिंदू संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया आहेत. आदिपुरूष हा चित्रपट हिंदू विराेधी आहे. देव चरित्रांचे यातून अवमान केला गेला आहे. देव चरित्रांना दिलेला संवाद हा अत्यंत निंदनीय आहे. यातून हिंदू इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे”.
कालीचरण महाराज यांनी या चित्रपटाला समर्थन करणाऱ्यांना देखील यावेळी फटकारले आहे. ते म्हणाले, या चित्रपटाला समर्थन करणारे स्वतःला सेक्युलर समजत आहे. यातून ते धर्माला विराेध करत आहे. परंतु हा चित्रपट पाहून ज्यांना वाईट वाटत आहे, ते धर्मप्रेमी आहेत. या धर्मप्रेमींनी चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे.
दरम्यान, या चित्रपटात सीतामाईचे पात्र करणारे अभिनेत्री क्रीती सेनाॅन हिने चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात 340 काेटी रुपयांची कमाई केल्याचे पाेस्टर ट्विट केले आहे. त्याखाली तिने ‘जय श्रीराम’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या पाेस्टवरून साेशल मीडियावर तिला पुन्हा ट्राेल करण्यात आले आहे. याचबराेबर तिच्या चाहत्यांनी तिच्या अभिनयाबाबत काैतुक केले आहे. मात्र अभिनेता प्रभास या चित्रपटातील प्रभू श्रीरामाची भूमिका करण्यास असमर्थ ठरला असल्याच्या प्रतिक्रिया साेशल मीडियावर उमटत आहे. एकप्रकारे अभिनेता प्रभास हा ट्राेल झाला आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून दिग्दर्शक ओम राऊत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. यावरून देखील संताप व्यक्त केला जात आहे.