‘आदिपुरूष’ चित्रपट काही दिवसांत प्रदर्शित हाेत आहे. या चित्रपटाच्या प्रमाेशनसाठी स्टार कास्ट, निर्माते आणि दिग्दर्शकांची लगबग सुरू आहे. सिनेमातज्ज्ञ आणि प्रेक्षक देखील या चित्रपटाविषयी बाेलत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जशी जवळ येत आहे, तसे निर्मात्याकडून सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून सैफ अली खान याच्या अभिनयाचे काैतुक केले आहे. तर अभिनेता प्रभास याच्या अभिनयावर जाेरदार टीका हाेत आहे. याशिवाय व्हीएफएक्सवर देखील जाेरदार टीका केली आहे.
हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत हाेता. त्याच्याभाेवती अनेक वाद झाले आहेत. तरी देखील हा तज्ज्ञांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कमाल दाखवेल, असे म्हणत आहे. काही तज्ज्ञांनी हा चित्रपट पहिल्याच दिवशी 50 काेटी पेक्षा जास्त कमाई करेल, असे म्हटले आहे. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ‘पठाण’ चित्रपटाला देखील मागे टाकेल, असे काही सिनेमा तज्ज्ञांनी म्हटले आहे.
‘पठाण’ चित्रपटाने जगभरात पहिल्या दिवशी 106 काेटी रुपयांची कमाई केली हाेती. प्रभासची स्टार पाॅवर पाहता ‘आदिपुरूष’ हा ‘पठाण’ चित्रपटाचा रेकाॅर्ड सहज माेडले, असेही म्हटले जात आहे. ‘आदिपुरूष’ चित्रपटावरून बराच वाद झाला असला, तरी ‘पठाण’ चित्रपटाचे सर्व रेकाॅर्ड ताेडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘आदिपुरूष’ सिनेमा 16 जूनला प्रदर्शित हाेत आहे.