बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दी शहा त्यांच्या कसदार अभिनयासाठी ओळखले जातात. तसेच त्या त्यांच्या वक्तव्यावर आणि मतांवर ठाम राहतात. गेल्या काही दिवसांपासून नसीरुद्दीन शहा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहे. परंतु चित्रपटसृष्टीत अभिनयासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर त्यांनी केलेल्या वक्त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
नसीरुद्दीन शहा यांनी फिल्मफेअर पुरस्कारावर भाष्य केले आहे. हे पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मी हे पुरस्कार वाॅशरुमच्या हॅंण्डलला लावले आहेत. परंतु फिल्मफेअर पुरस्कार हा चित्रपटसृष्टी अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जाताे. नसीरुद्दीन शहा यांनी पुरस्कार केलेल्या भाष्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
नसीरुद्दीन शहा यांच्या या विधानावर बाॅलिवूडमधून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आघाडीचा अभिनेता मनाेज वाजपेयी आणि दिग्गज दिग्दर्शक सुभाष घई यांनी साेशल मीडियावर याबाबत संतप्त प्रतिक्रिया देत नसीरुद्दीन शहा यांना खडेबाेल सुनावले आहेत.

‘फिल्मफेअर हे माझ्यासाठी स्वप्न आहे. फिल्मफेअर बघत मी लहानाचा माेठा झालाे आहे. या पुरस्कारामुळे कलाकाराला ओळख मिळते. फिल्मफेअर मिळणे सर्वात अमूल्य क्षणापैकी एक आहे. हा पुरस्कार अभिमानाचा आणि महत्त्वाचा आहे’, अशी प्रतिक्रिया मनाेज वाजपेयी यांनी व्यक्त केली आहे.
सुभाष घई यांनी देखील नसीरुद्दीन शहा यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. फिल्मफेअर पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे. त्याचा अनादर करू नये. या पुरस्कारासाठी अनेकदा मानांकन मिळाले. परंतु प्रत्यक्षात तीन वेळा पुरस्कार मिळाल्याचे सुभाष घई यांनी म्हटले आहे.