ताकदीचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 28 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला हाेता. परंतु शाे मिळत नसल्याने त्याने चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट नऊ जूनला प्रदर्शित हाेत आहे. या चित्रपटाविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खास पाेस्ट शेअर केली आहे. खासदार सुळे यांची ही पाेस्ट आवाहन करणारी असून, ही चित्रपट पाहाच, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्या म्हणतात की, “इंदापूरला आल्यावर तिथे ऋषी भेटला. ऋषीनी ‘टीडीएम’ नावाच्या सिनेमात काम केले आहे. दादांनी आणि मी हा चित्रपट पाहिलाय. तुम्ही कधी पाहणार? नक्की चित्रपट पाहा, तुम्ही नक्ती आवडेल”.
खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर करताना आपल्या बारामती लाेकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी ऋषी विलास काळे यांची भेट झाली. ऋषी लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘टीडीएम’ या चित्रपटातून माेठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या भेटीत त्याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास जाणून घेतला. त्याला प्रदर्शित हाेत असलेल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.
‘टीडीएम’ला चित्रपटागृहांमध्ये शाे मिळत नसल्याने भावूक झाले हाेते. पुण्यात ‘टीडीएम’च्या टीमने चित्रपटगृहांबाहेर आंदाेलन देखील केले हाेते. या आंदाेलनाची दखल अजित पवार यांनी घेतली. चित्रपटाबद्दल ट्विट करत त्यांनी ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या ‘टीडीएम’ या चित्रपटाला सिनेमागृहात स्क्रीन न मिळणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लाॅटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन द्यावी’.