यावर्षी 29 जूनला आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने पंढरपूरला भाविकांची लगबग सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेली नृत्यांगणा गाैतमी पाटील देखील पंढरपुरात आहे. तिने तिथं विठ्ठल-रुख्मिणीचं दर्शन घेतलं आहे. यानिमित्ताने तिने वारकऱ्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गाैतमी पाटील हिची महाराष्ट्रात क्रेझ आहे. तिचा कार्यक्रम म्हटला की, युवक, तरुणांची गर्दी हाेती. गेल्या काही दिवसांपासून तिच्या कार्यक्रमात राडा हा सूत्रच बनलं आहे. यात ती पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनाला येणार म्हटल्यांवर तिच्या येण्याची खबर वाऱ्यासारखी पंढरपुरात पसरली हाेती. त्यामुळे मंदिर परिसरात पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त हाेता.

विठ्ठल-रुख्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर तिने विठुरायाला ‘आशीर्वाद असू दे’, अशी गळ घातली. त्यानंतर तिने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ‘मी या भागात कार्यक्रमासाठी आले हाेते. पंढरपुरात येताच इथं विठुरायाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी आले’. वारकऱ्यांसाठी कार्यक्रम घेणार का? या प्रश्नावर ती म्हणाली, ”वारकऱ्यांसाठी कार्यक्रम घेण्याची नक्कीच इच्छा आहे. परंतु अद्यात तशी काेणतीच तयारी नाही”.