महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहे ती म्हणजे नृत्यांगणा गाैतमी पाटील. सध्या गाैतमी चर्चेत आहे, ती तिच्या लग्नामुळे. तिने एका मुलाखतीत लग्नाबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या हाेत्या. या मुलाखतीनुसार बीड जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने गाैतमीला लग्नाची मागणी घातली आहे. या लग्नासाठी त्याने गाैतमीच्या सर्व अटी मान्य असल्याचेही म्हटले आहे. या शेतकरी पुत्राने गाैतमीला पत्र लिहिले असून, त्याने त्याच्या घराचा पत्ता देखील दिला आहे.
गौतमी पाटील हिच्या प्रत्येक कृतीवर आणि विधानावर महाराष्ट्राचे लक्ष असते. मागे तिने तिच्या लग्नाबद्दल सांगितले होते. ती म्हणाले हाेती, लग्न करून संसार थाटण्याचा विचार आहे. याेग्य आणि समजून घेणारा जाेडीदार पाहिजे आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिंचाेलीमाळी इथल्या राेहन गलांडे पाटील या शेतकरी पुत्राने गाैतमीला लग्नाची मागणी घातली आहे. त्याने गाैतमी पाटील हिला पत्र लिहिले आहे.
तुझ्या इच्छा-अटी मान्य आहे. सगळ्या अटी मान्य आहे. बाेल तू हाेती काम माझी परी, असे त्याने पत्रात म्हटले आहे. गलांडे पाटील पत्रात पुढे म्हणाला आहे की, “तू जशी आहेस, तशी मला आवडली आहेस. तुझ्यासाेबत कुणी लग्न करत नसेल तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासाेबत लग्न करायला तयार आहे. मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती, दूध सगळं संपन्न आहे. तुझी तयारी असेल, तर भेटायला ये”.