‘द केरळ स्टाेरी’ हा चित्रपट अजूनही विक्रम करत आहे. द केरळ स्टाेरी हा चित्रपट सिनेमा गृहात येवून 24 दिवस झाले. या दिवशी देखील या चित्रपटाने आपल्या नावावर विक्रम केला आहे. सुदीप्ताे सेन यांच्या दिग्दर्नाखाली बनलेला हा वादग्रस्त चित्रपट 200 काेटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. चाैथ्या विकेंडला बाॅक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.
गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल 10.50 काेटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची एकूण कमाली आता 206 काेटी रुपयांच्या आसपास झाली आहे. स्पर्धेच्या कमतरेचा फायदा हा या चित्रटाला मिळाला आहे. कमल हसन ते अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाला ‘प्रोपगंडा’ फिल्म असल्याचे म्हटले हाेते. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
‘द केरळ स्टाेरी’ या चित्रपटाचे रविवारचे कलेक्शन 4.25 काेटी रुपयांच हाेते, असे बाॅक्स ऑफिक्स इंडियाने म्हटले आहे. यापूर्वी शनिवारी चार काेटी आणि शुक्रवारी 2.25 काेटी रुपयांचा व्यवसाय केला. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रदर्शित हाेऊन 24 दिवस झाले आहेत. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरला गुरुवारपर्यंत चित्रपटाची कमाई घसरली हाेती. पण विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली.
‘द केरळ स्टाेरी’ या चित्रपटावरची पश्चिम बंगालमध्ये असलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने उठवली आहे. याचबराेबर या चित्रपटाचे बजेट 10 ते 15 काेटी रुपये असून, 200 काेटी रुपये कमावले याची देशभरच नाही, तर जगभर चर्चा हाेत आहे.