स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर यांच्या शाैर्य, बलिदानावर हिंदी वेबसीरिज येत आहे. ‘वीर सावरकरः सिक्रेट फाइल्स…’ लवकरच छाेट्या पडद्यावर झळकणार आहे. या वेब-सिरीजची नुकतीच घाेषणा झाली आहे. या वेब-सिरीजचे दाेन टीझर आणि पाेस्टर प्रदर्शित झाला आहे.
“या वेब-सिरीजमधून स्वातंत्र्यवीर विनायक दाेमादर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट प्रेक्षकांच्या समाेर येणार आहे. वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स… ही वेब-सिरीज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर ठरेल”, असे प्रतिक्रिया सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिली. या वेब-सिरीजमध्ये मराठमाेठा अभिनेता साैरभ गाेखले सावरकरांची मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याच लूकही सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
सात्यकी सावरकर म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. एखाद्या विषयाबद्दल सावरकर यांची भूमिका काय हाेती, त्यांचा त्याग आणि बलिदानाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या बेव-सिरीजमधून ही भूमिका मांडली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सावरकर यांच्यावर सातत्याने टीका हाेत आहे. ही बेव-सिरीज या टीकेला प्रत्युत्तर असणार आहे. या वेब-सिरीजच्या माध्यमातून दुर्लक्षित सावरकर प्रेक्षकांसमाेर येणार आहे, याचा सर्वाधिक आनंद आहे”.
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका आव्हानात्मक आहे. त्यांचा त्याग, बलिदान, शाैर्य माेठं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तिरेखा साकरण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजताे. या व्यक्तिरेखेचा अभ्यास, त्यांच्याबदल्लचे साहित्य वाचून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने ही भूमिका साकरण्याचा माझा प्रयत्न असणार आहे”, अशी प्रतिक्रिया सावरकरांची भूमिका साकारणारे साैरभ गाेखले यांनी दिली.
ही वेब-सिरीज पुढीलवर्षी 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीला प्रदर्शित हाेणार आहे.