अभिनेत्री कंगना रणाैत आणि अभिनेता आर माधवन यांची प्रमुख भूमिका असलेल्या तनु वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटाला प्रदर्शित हाेऊन आठ वर्षे पूर्ण झाली. आनंद एल राय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला हाेता. चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिल्याने ताे जबरदस्त सुपरहिट ठरला हाेता.
हा चित्रपटात एका जाेडप्याची स्टाेरी आहे. ज्यात शांत, संयमी मनू म्हणजेच माधवन आणि उत्साही, चिडकी, जबरदस्त धडाकेबाज तनू म्हणजे कंगना यांची लव्ह स्टाेरी आहे. या चित्रपटात दाेघांची लव्ह स्टाेरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. या चित्रपटाच्या दुसरा भाग म्हणजे तनु वेड्स मनू रिटर्न्सला काल आठ वर्ष पूर्ण झाली.
यानिमित्ताने कंगणा रणाैतने तिच्या साेशल मीडियावर काही थ्राेबॅक फाेटाे शेअर केले. यात ती दिग्दर्शक आनंद एल राय देखील आहेत. या फाेटाेंबराेबरच कंगणाने दिग्दर्शक आनंद यांना विनंती केली आहे की, “जसे तनु वेड्स मनू रिटर्न्सने आठ वर्षे पूर्ण केली आहे. पब्लिक डिमांडनुसार या चित्रपटाचा तिसरा भाग आनंद यांनी बनवावा. तशी माझी देखील विनंती आहे. क्या बाेलते हाे दाेस्त”.