बुरूडगाव येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने कालीचरण महाराज यांची धर्मसभा झाली. यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राहुल महाराज दरंदले, महंत शंकरनाथ महाराज, महंत ओमभारती महाराज आदी उपस्थित होते.
कालीचरण महाराज म्हणाले, “अहमदनगरचे नाव प्राचीनकाळी अगस्त्यनगर होते. पुढे ते अंबिकानगर झाले. यानंतर मुस्लिम राजाने अहमदनगर हे नाव ठेवले. जेथे हिंदू अस्मिता आहेत, त्या अस्मिता जपण्यासाठी नामांतर होण्याची आवश्यकता आहे”. कुठलीही धर्मनिरपेक्ष संकल्पना अस्तित्वात नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म असा दावा कालीचरण यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रातील नाथांच्या समाध्यांचे मुस्लिमांकडून कब्जा केला जात आहे. त्याचे पीरमदारमध्ये रूपांतर करण्याचे षडयंत्र सुरू आहे. साईबाबांनाही मुस्लिम ठरवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या हिंदूंनी त्याला बळी पडू नये, असेही आवाहान कालीचरण महाराज यांनी केले.