Pakistan-China :श्रीलंकेप्रमाणेच चीनने पाकिस्तानला गोवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली असून पाकिस्ता हा डिफॉल्टच्या उंबरठ्यावर आहे. चीन आणि पाकिस्तान दोघेही आयर्न ब्रदर्स असल्याचा दावा करत आहेत. पण अमेरिकेने या कथित मैत्रीचा पर्दाफाश केला आहे. केवळ पाकिस्तानच नाही, तर जगातील इतर देशांना चीनच्या कर्जाबाबत अत्यंत सावध राहावे लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. चीनने एकूण विदेशी कर्जापैकी 30 टक्के कर्ज पाकिस्तानला दिले आहे. पाकिस्तानवर सध्या 100 अब्ज डॉलरचे परकीय कर्ज आहे आणि त्याच्याकडे फक्त 3 बिलियन डाॅलर परकीय चलन साठा आहे, अशा प्रकारे चीनचे पाकिस्तानवर 30 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. सध्या पाकिस्तान मोठ्या गरिबीच्या अवस्थेत पोहोचला आहे आणि त्याच्या डिफॉल्टचा धोका आहे. पाकिस्तान विदेशी कर्जाचा हप्ता परत करू शकला नाही, तर त्याला डिफॉल्ट घोषित केले जाईल. चीनच्या पाकिस्तानवरील वाढत्या कर्जावर अमेरिकेने आता गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे समुपदेशक डेरेक चोलेट यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये चीनच्या वाढत्या कर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित केला. पाकिस्तान ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ आहे, पण आता भारताशी शत्रुत्व निर्माण करण्यासाठी चीनच्या कुशीत गेला आहे.
