Breaking :उद्धव ठाकरे गटाला माेठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव ठाकरे गटाला गमवावं लागलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयाेगासमाेर या निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे.
धनुष्यबाणासह शिवसेनेवर ठाकरे गटाची पहिल्यापासून मागणी हाेती. आम्हाला आमचे चिन्ह द्यावे. मात्र तसे झाले नाही. ठाकरे गटाच्यावतीने महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयाेगासमाेर युक्तिवाद केला हाेता, तर शिंदे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे यांनी बाजू मांडली.
पक्षाचं नाव आणि चिन्हा दाेन्ही शिंदे गटाला मिळाल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला माेठं वळण देणारा हा निर्णय झाला आहे. निवडणूक आयाेगाच्या या निर्णयावर विधीज्ञ, विश्लेषण आपआपली मते मांडत आहेत.