भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी माेठी मागणी केली आहे. या मागणीद्वारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना टार्गेट केले आहे. एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची ही मागणी आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी डोवाल यांना एनएसएच्या पदावरून हटवावे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले की, पेगासस टेलिफोन टॅपिंगसारखी चूक आपण अनेकदा केली आहे”. तसे न झाल्यास पंतप्रधान मोदींना 2023 च्या मध्यात पद सोडावे लागू शकते, असेही स्वामी म्हणाले. ट्विट करताना सुब्रमण्यम स्वामी यांनी अजित डोवाल यांच्याबाबत या गोष्टी सांगितल्या आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी डोभाल यांना बडतर्फ करण्याची मागणी, तर केलीच पण तसे न झाल्यास पंतप्रधान मोदींनाही पद सोडावे लागू शकते, असेही सांगितले.
अदानी समूहाबाबत नुकताच आलेला हिंडेनबर्ग अहवाल आणि त्यानंतर निर्माण झालेल्या संपूर्ण वादावर सुब्रमण्यम स्वामी यांनी अदानी समूहाच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण केले पाहिजे, असे म्हटले होते. काँग्रेसने अदानीशी कधीच करार केला नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते की, मी त्यांच्यापैकी अनेकांना ओळखतो, ज्यांचे अदानीसोबत अनेक सौदे आहेत, पण मला काँग्रेसची पर्वा नाही. भाजपचे पावित्र्य प्रस्थापित व्हावे, अशी माझी इच्छा आहे.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक