अहमदनगर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती झाली आहे. डाॅ. राजेंद्र भाेसले यांची मुंबई उपनगरला जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. अहमदनगरला जिल्हाधिकारी बदली हाेण्यापूर्वी ते सिडकाेच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत हाेते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सालीमठ हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम पाहत हाेते.
सालीमठ हे २०११ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कृषी संशोधनात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. १९९५ पासून ते प्रशासकीय सेवेत आहेत. महसूल, शहरी विकास, जमीन अधिग्रहण विषयावर सालीमठ यांनी काम केले आहेत. कणकवली, जव्हार, सावंतवाडी इथं त्यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगलीत जमीन अधिग्रहण अधिकारी, साेलापूरला निवासी उपजिल्हाधिकारी, यूएलसी मुंबईचे सक्षम प्राधिकारी, काेकण महसूल विभागात उपायुक्त म्हणून काम पाहिले. पालघर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी कुपाेषण निर्मुलनावर विशेष काम केले. सुपाेषण उद्यान, रानमेवा स्पर्धा, संपूर्ण स्वास्थ्य आहार महाेत्सव हे उपक्रम त्यांचे गाजले.
नागरी विकासात काम करताना त्यांनी मुंबईतील मेट्राे रेल तीन, मेट्राे रेल सात, पुणे मेट्राे रेल, नागपूर मेट्राे रेलचे प्रकल्पावर महत्त्वकांक्षीपद्धतीने काम केले.