सिंधुदुर्गात सहा मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समाेर आली आहे. सावडाव (ता. कणकवली) गावात ही घटना घडली. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत जात असलेल्या रस्त्यावर चाकुचा धाक दाखवून मुलांचे अपहरणाचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्ह्याची नाेंद घेतली आहे.
याबाबत घटनाक्रम असा, शाळेकडे रस्त्याने जात असताना या सहा मुलांना अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना वाहनात कोंबले; मात्र काही अंतरावर गेल्यावर आतील एकाला फोन आल्याने वाहनातील एका रस्त्यावर थांबली. ही संधी साधून मुलांनी हुशारी दाखवली आणि अपहरणकर्त्यांच्या वाहनातून पळ काढला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. यानंतर पाेलिसांना माहिती देण्यात आली. पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुलांनी केलेल्या वर्णनावरून वाहनाचा शाेध सुरू केला आहे.
पोलिसांनी या अपहरणकर्त्यांचा शाेध घेत आहे. मात्र पाेलिसांच्या हाती काहीच लागले आहे. पाेलिसांनी माेबाईल लाेकेशन काढून अपहरणकर्त्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तालुक्यातील काही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पाहून वाहनाचा शाेध घेतला जात असल्याची माहिती कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली.