बीडमधील 11 युवकांची प्रत्येकी पाच लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. शिर्डी पाेलिसांत याप्रकरणी गुन्ह्याची नाेंद झाली आहे. यात शिर्डी पाेलिसांनी तिघांना अटक केली असून, यात माेठी टाेळी सक्रिय असल्याचा पाेलिसांचा अंदाज आहे.
शिर्डी विमानतळावर नाेकरी लावून देताे, असे म्हणत बनावट नियुक्ती पत्र देऊन बीडमधील 11 तरुणांची फसवणूक केली. तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये शिर्डी विमानतळावर नोकरी निमित्तानं बीड जिल्ह्यातील अकरा तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं होत. यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात सखोल तपास केला असता गोकूळ राजाराम कांदे निफाड, गोकूळ गोसावी सिन्नर, विलास गोसावी सिन्नर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.