Ahmednagar Education Meeting ः “शैक्षणिक धोरणात औद्योगिक क्षेत्राचा सहभाग खूप महत्वाचा आहे. समाजाभिमुख सुविधांसाठी नगरमध्ये काय चांगले करता येईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आजपर्यंत विद्यापीठ व इंडस्ट्रीज कधीच एकत्र आले नाहीत. विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसचे शिक्षण घेत असताना त्यांना अनुभवासाठी कारखान्यांमध्ये प्रात्यक्षिक करता यावे यासाठी विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी पुढाकार घेत पुणे विद्यापीठ व औद्योगिक हे दोन्ही क्षेत्र एकत्रित आले आहेत. पुण्यामध्ये केमिकल, मॅन्यूफॅरिंग, पॉलीमर व प्लास्टिक क्लस्टर, सिए व सामाजिक संघटनांचा एकत्रित ग्रुप करून विद्यार्थ्यांसाठी आपले योगदान देत आहेत. नगरमधेही हा प्रयोग करण्यास हरकत नाही. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आमी संघटना व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमाने नगरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांसाठी आपले दावीत्व देवून त्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी जे काही करता येईल ते करण्यास प्राधान्य देवू”, असे आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी देत या बैठकीसाठी अनंत देसाई यांनी योग्य पुढाकार घेत महत्वाची बैठक घडवून आणल्याबद्दल कौतुक केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी मंगळवारी नगरमध्ये आले असता हिंद सेवा मंडळाचे संचालक अनंत देसाई यांच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आमी संघटना व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसीमधील उद्योजक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी मार्गदर्शन केले. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, अमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खताळ, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, संचालक प्रा.मकरंद खेर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित उद्योजकांनी अनेक सूचना केल्या. औद्योगिक क्षेत्रात कौशल्य असलेल्या कामगारांची कमतरता मोठ्याप्रमाणावर भासत आहे. विद्यापीठाने कौशल्य विकासावर भर देणारे शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणीक सुविधा द्याव्यात, सोलर व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचे अधिक प्रशिक्षण देण्यास विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशा सूचना केल्या.
संयोजक अनंत देसाई यांनी प्रास्ताविकात नवे शैक्षणीक धोरण येत आहे. यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे कौशल्य विकासास प्राधान्य देता येईल. यासाठी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे.
रवींद्र मुळे, उद्योजक राजेंद्र कटारीया, मधुसूदन सारडा, सुनीत लोढा, चिन्मय सुकथनकर, मिलिंद ऋषी, दौलत शिंदे, अमोल घोलप, मिलिंद हराळे, के.एम.भिंगारे, जयकुमार मुनोत, तरुण कुलकर्णी, सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य माहेश्वरी गावित, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, अशोक असेरी, सिएसानित मुथा, प्रसाद पुराणिक, अरुण कुलकर्णी, मिलिंद गंधे, हिराकांत रामदासी, प्रवीण गोरे, निनाद टिपूग उपस्थित होते. संजय बंदेष्टी यांनी सूत्रसंचालन केले.