Lord Shriram Navami ः भारतवासीयांचे अनेक वर्षाचे राम मंदिराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असल्यामुळे समाजामध्ये आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्रीराम यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे असून त्या माध्यमातून चांगले काम करण्याची ऊर्जा आपल्या सर्वांना मिळत असते. धार्मिक,अध्यात्मिक तेथून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते. नगर शहरामध्ये प्रभू श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाल्याने यंदा रामनवमीला विशेष महत्व प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रभू श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष केतन क्षीरसागर, युवराज शिंदे,माजी सभापती अविनाश घुले, सुरेश बनसोडे, चेअरमन नवनाथ वाघ, सोमनाथ तांबे, रवी दंडी, अजय भोसले, ऋषिकेश जगताप, निर्मला जाधव ,सुनिता पाचारणे, वृषाली सातारकर, अर्चना परकाळे, शितल गाडे, शितल राऊत, गीता कामत, सुवर्णा गिऱ्हे, अपर्णा पालवे, शालिनी राठोड, अलिषा गर्जे , लता गायकवाड ,सुजाता दिवटे, स्नेहल गीते, नंदा पांडुळे उपस्थित होते.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सर्व महिलांनी एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रम घेत भाक्तिमय वातावरणात श्रीराम नवमी उत्साहात साजरी केली. तसेच यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रभू श्रीराम यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात केले पाहिजे, असे मत रेश्मा आठरे यांनी व्यक्त केले.