Bhingar News ः भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनिल काळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बेलपवार, राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, अनिल तेजी, अशोक भिंगारदिवे, दिनेश कांबळे, प्रकाश गोहेर, दास निधाने, दीपक भिदोरिया, राहुल विघावे, विक्रम चव्हाण आदी उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले, “दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ. बाबासाहेबांनी कार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना असतित्वात आली. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांमुळे मिळाला”. त्यांचे विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.