Ahmednagar Police ः महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या श्रीरामपूरमधील दोन महिलांना राहुरी पोलिसांनी सापळा लावून पकडले. पूजा आकाश रोकडे आणि संगीता जीवन लोंढे (दोघे रा. श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली.
महिला तिच्या आईला सोडण्यासाठी कोल्हारवरून बीडकडे जात असलेल्या बसमध्ये अनोळखी तीन महिलांनी फिर्यादी महिलेस धक्काबुक्की केली. यात तिच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली. राहुरी पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला. महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन् दाखल झाला. राहुरी पोलीस या चोरीतील आरोपींचा शोध घेत होते.
राहुरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आणि गोपनीय माहितीनुसार महिला आरोपी पूजा आकाश रोकडे आणि संगीता जीवन लोंढे (दोघे रा. श्रीरामपूर) यांना शिताफिने अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपी महिलांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज पाटील करीत आहेत.
या चोरीचा तपास उघडकीस होण्यासाठी उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, अशोक शिंदे, पोलिस नाईक गणेश सानप, गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, महिला पोलीस नाईक वृषाली कुसळकर, चालक उत्तरेश्वर मोराळे, श्रीरामपूर येथील पोलीस नाईक सचिन धनाड यांचे पथक कार्यरत होते.