Ahmednagar Political ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्यावतीने नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दोन्ही मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी केली होती.
प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी, सुदीप गायकवाड, झोन प्रभारी काळुराम चौधारी व आप्पासाहेब लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या मुलाखतीप्रसंगी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, राजू खरात, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, महिला जिल्हाध्यक्ष अनुरीता झगडे, जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण, शहानवाज शेख, जिल्हा कोषाध्यक्ष सूर्यभान गोरे, जिल्हा सचिव सुभाष साबळे, उत्तर भारतीय संयोजक त्रिपाठी, सोनवणे, शिर्डी लोकसभा अध्यक्ष बाळासाहेब भोसल, विधानसभेचे प्रभारी महादेव त्रिभुवन, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काटे, महिला शहराध्यक्ष अंजुम सय्यद, नगर शहराध्यक्ष फिरोज शेख, शहर कोषाध्यक्ष रवींद्र चौधरी उपस्थित होते.
पक्षाच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करुन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तर दोन्ही मतदार संघातील बलस्थाने व उणीवा यांची माहिती घेतली.
डॉ. हुलगेश चलवादी म्हणाले, “बहुजन समाज पक्ष नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देणार आहे. प्रस्थापितांविरोधात बसपा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे”. काही दिग्गज नेते देखील पक्षाच्या संपर्कात असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार आहे. जनतेला बदल आवश्यक असल्यास त्यांना देखील मतदानातून बदल घडवावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. रवि भालेराव, अनिस सय्यद, कैलास कोळगे, किरण भोसले, साहेबराव मुंतोडे, भागवत ससाणे, शशिकांत नवगिरे, गौतम चव्हाण, सुंदर नवगिरे, कैलास थोरात, महेबूब पठाण, राहुल छत्तीसे आदी उपस्थित होते.