Ahmednagar Political ः नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडी लवकरच स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
नगर जिल्ह्यात आणि शिर्डी मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरवले आहे. सध्याला दोन्ही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संतोष गलांडे, राज्य समन्वयक अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष नगर दक्षिण प्रतीक बारसे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक धनश्री शेंडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी वर्षा बाचकर, जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी निलेश गायकवाड, महासचिव शनेश्वर पवार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत नेटके, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, तालुकाध्यक्ष युवा आघाडी पप्पू चव्हाण, कर्जत शहर अध्यक्ष राहुल मोहोळ, दादा समुद्र, जीवन पारदे, अमर निर्भवणे, मनोहर जिंदम, सिसिल भगत, प्रवीण ओरे, आबासाहेब रामफळे उपस्थित होते.