Ahmednagar Police ः चोर काय चोरी करून नेतील, याचा नेम नाही. ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे चोरींच्या घटनांमध्ये अधिकच वाढ होणार अशी चिन्हे आहेत. यात चोरांनी शेतकऱ्यांचे चार बैल चोरून नेल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील खर्डे येथे घडली आहे. काही संशयित आरोपींची माहिती पोलिसांनी घेतली आहे.
या चोरीबाबत शेतकरी शिवनाथ बाबुराव घोरपडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या परिसरात शेतकऱ्यांची अनेक जनावरे चोरी गेली आहेत.
शेतकरी शिवाजी घोरपडे यांनी गुरुवारी रात्री बैलांना चारा-वैरण करुन केले. तेव्हा चारही बैल गोठ्यात बांधलेले होते. घोरपडे शुक्रवारी सकाळी झापेतून उठले त्यावेळी गोठयाकडे गेले असता त्यांना गोठ्यामध्ये एकच बैल दिसला.चार पैकी तीन बैल कोणीतर चोरांनी चोरुन नेले. सुमारे लाखो रुपये किमतीचे बैल शेतकऱ्यांचे चोरी गेले. एेन दुष्काळात चोरांनी शेतकरी यांच्या पाळीव जनावरांना टार्गेट केल्याने शेतकऱ्यांवर संकेट ओढवले आहे.
या परिसरात शेतकऱ्यांचे पशुधन चोरणारी काही संशयित व्यक्ती असून त्यांचा कायमचा बंदोबस्त होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वीही या संशियतांनी, असे चोरीचे गुन्हे केले आहेत. त्यावेळी त्यांनी त्यांचे पशुधन परत दिले तर काही घटनेत पैसे दिल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी ही अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे.