Nagar Political News ः सरकारी योजना खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत घेऊन जाण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. सिद्धार्थनगर आणि गवळीवाडा परिसरातील अंतर्गत कॉलनीतील रस्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या कामासाठी खासदार विखेंकडे तातडीचा निधी मागितला आणि तो त्यांनी उपलब्ध करून दिला. गवळीवाडा परिसर स्वच्छ झाला असून नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तसेच सिद्धार्थनगरमधील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी खासदार सुजय विखे यांनी केलेल्या कामाचे स्वागत केल्याचा आनंद माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला.
सिद्धार्थनगर आणि गवळीवाडा येथे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण झाले. यावेळी प्रताप परदेशी, कल्पेश परदेशी, अभिजीत ढोणे, विशाल वाघमारे,अशोक साठे, गौरव साळवे, विजय पठारे, वैभव नेटके, सचिन शेलार, लक्ष्मण शिंदे, सागर भालेराव, दिगंबर नागपुरे, रामभाऊ हुच्चे, दीपक गोंधळे, अण्णासाहेब साळवे, बॉबी भोसले, राणी दाभाडे, सुनीता साळवे, लता कांबळे, रेखा धीवर, छाया शिंदे, रेशम शिंदे, लता घोरपडे, पुष्पा भोसले, आशा वाघमारे, चंदा लालबिगे, रेश्मा साठे उपस्थित होते.
खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून गवळीवाडा आणि सिद्धार्थ नगरमध्ये नियोजनबद्ध व कायमस्वरूपी रस्ता कॉंक्रिटीकरण्याचे काम मार्गी लागले. या भागातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. आम्ही कधीही अशा प्रकारचा रस्ता पाहिला नाही. मात्र त्यांनी आमचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला आहे. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी देखील या कामाच्या पाठपुरावा करून चांगले दर्जेचे काम आम्हाला करून दिले आहे, असे मत या भागातील नागरिकांनी व्यक्त केले.