Shrirampur News समाज माध्यमांवरून मैत्री करणे अल्पवयीन मुलीला महागात पडले आहे. पीडित मुलीशी ओळख वाढवून शाळा आणि शाळा परिसरात भेट घेऊ लागला. यानंतर तिच्याबरोबर फोटो काढले. मुलीचा पाठलाग सुरू केला. यानंतर तु मला खूप आवडतेस, असे बोलून गैरवर्तन केले. मुलीबरोबरचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केले याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून यश हरिभाऊ चौधरी (वय २१, रा. चौधरी वस्ती, जळगाव, ता. राहाता) याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
अल्पवयीन पीडितेची गंभीर स्वरुपाची तक्रारी होती. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी याची दखल घेत आरोपीचा शोध घेण्याच्या गुन्हे पथकाला सूचना केल्या. यश हा घरी असून, तो पसार होण्याच्या तयारी होता. गुन्हे पथकाने त्याला लगेचच ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने पीडित मुलीशी गैरवर्तन केल्याची माहिती दिली. समाज माध्यमांवर फोटो व्हायरल केल्याचे सांगितले. तक्रार पोलिसांपर्यंत गेल्याची भनक लागल्याने मुंबई निघून चालल्याचेही त्याने चौकशीत सांगितले. उपनिरीक्षक समाधान सोळंके,उपनिरीक्षक सुरेखा देवरे मॅडम, परिविक्षाधीन उपनिरीक्षक दिपक मंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
श्रीरामपूर शहर पोलिसांकडून पोक्सो कायद्याबाबत जनजागृतीसाठी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. १८ वर्ष पेक्षा कमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, प्रत्यक्ष वा सोशल मीडियावरून पाठलाग केल्यास, प्रेमाच्या जाळयात ओढल्यास, पळवून नेल्यास असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व त्यांना असे कृत्य करण्यास मदत करणार्या व्यक्त विरुध्द तात्काळ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.