Crime News ः बदलत्या हवामानाचा अंदाज घेण्यासाठी राज्य सरकारने पाथर्डीतील तिसगाव येथे स्वयंचलीत उपकरणे बसवली होती. या उपकरणांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनीचे सागर पवार यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद घेतली आहे.
पवार यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनी हवामानाच्या नोंदी मिळवण्यासाठी स्वयंचलीत उपकरण किट बसवते. तिसगाव (ता. पाथर्डी) येथे देखील हवामान केंद्रावर स्वयंचलीत उपकरण बसवले होते. या स्वयंचलीत यंत्राद्वारे हवामानाची माहिती तालुका कृषी कार्यालय,जिल्हा कृषी कार्यालय,तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांना माहिती प्राप्त होते.
पाथर्डी तालुक्यात तिसगाव, मिरी, कोरडगाव, टाकळीमानुर, माणिकदौंडी, पाथर्डी येथील प्रत्येक महसूल मंडळावर तसेच हवामान केंद्रावर स्वयंचलीत उपकरण बसविलेले आहेत. याची देखभाल स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनीकडे आहे.
तिसगाव येथे नवीन हनामान स्वयंचलीत उपकरण बसविले होते. पाथर्डी येथील कृषी परीवेक्षक सुनिल देखणे यांनी पवार यांना फोन करून कळवले की, तिसगाव येथील हवामान केंद्रावरील उपकरण दिसत नाही. चोरी झाल्याचे दिसते. यानंतर तिथे जाऊन पाहणी केल्यावर हवामान केंद्रावरील स्वयंचलीत उपकरण नव्हते. चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर सागर पवार पवार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. सुमारे आठ हजार रुपयांचे उपकरणाचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार म्हटले आहे.