Nagar News : नगर शहरातील केडगावमधून दोन अल्पवयीन जुळ्या मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुलींच्या फिर्यादींवरून अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुलींच्या शोध घेण्यासाठी कोतवाली पोलिसांनी पथक नेमले आहे.
फिर्यादी आणि त्याचे कुटुंब हे केडगाव उपनगरात राहते. फिर्यादीचे घराजवळ छोटेसे दुकान आहे. फिर्यादी हे मंगळवारी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यानंतर फिर्यादीची पत्नी, मुलगा आणि दोन मुली हे घरीच होते. दुपारी जेवणासाठी सर्व कुटुंब एकत्र जमले. फिर्यादी यांची पत्नी दुकानात होती. परंतु कुटुंबातील इतर सदस्य घरात नव्हते. फिर्यादीने घरात चौकशी केल्यावर जुळ्या मुली बेपत्ता झाल्याचे समजले.
यानंतर फिर्यादी वडील आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुलींच्या शोधासाठी संपर्क सुरू केला. केडगाव उपनगरासह आजूबाजूला देखील शोधाशोध सुरू केली. यानंतर देखील त्या मिळून आल्या नाहीत. यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. कोतवाली पोलिसांनी फिर्यादीकडून प्राथमिक माहिती घेतली असून, त्यानुसार बेपत्ता मुलींच्या शोध सुरू केला आहे. दरम्यान, मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.