टोयोटाने सर्वात स्वस्त 7 सीटर लाँच केलेली टोयोटा रुमियन कार नुकतीच लाँच झाली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील व परवडणारी रुमियनची बुकिंग सुरु झाली आहे. बुकिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन शोरुमचे जनक आहुजा यांनी केले आहे.
टोयोटा मोटर्सने सर्वात परवडणारी टोयोटा रुमियन कार बाजारपेठेत आणली आहे. टोयोटा रुमियन ही सध्याची कमी खर्चातील आणि दर्जेदार फिचर्सचा समावेश असलेली उत्तम फॅमिली कार ठरली आहे. ज्याची किंमत 10.29 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमधील फिचर्स इतर कारच्या तुलनेत उत्कृष्ट आहेत. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये लाँच केलेल्या टोयोटा रूमियनची किंमत विविध रेंजमध्ये पाहायला मिळते.
रुमियनला 1.5-लिटर -सिरीज पेट्रोल इंजिन मिळतं, जे 102 पॉवर आणि 137 टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, तसेच पर्यायामध्ये ते 87 पॉवर आणि 122 टॉर्क निर्माण करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहेत. इंटेरियरबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन टोयोटा रुमियनमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. याशिवाय टोयोटा आय-कनेक्ट, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि इतर अनेक वैशिष्ट्यांनी ही कार सुसज्ज आहे. तसेच, टोयोटा रुमियनमध्ये वुड इन्सर्टसह ड्युअल-टोन इंटेरियर्स उपलब्ध आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये ड्युअल फ्रंट आणि साइड एअरबॅग्ज आहेत. त्याच बरोबर या कारमध्ये इंजिन इमोबिलायझर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रामसह इतर गुणवैशिष्टये उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.