भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) चलनातून 2000 हजार रुपयांच्या नाेटा बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत हा नाेटा बॅंकेत बदलून मिळतील, असे सांगितले. आता सप्टेंबर महिना संपण्यासाठी अवघा एक दिवस राहिला आहे. त्यामुळे आपल्याकडे 2000 हजार रुपयांच्या नाेटा असल्यास त्या आताच बदलून घ्या, आणि तशी खात्री करून घ्या. मुदत संपल्यानंतर 2000 रुपयांच्या नाेटाचे बदलता येईल का, यावर देखील चर्चा सुरू आहे. जर तसे झाले, तर RBI त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवले, अशी माहिती मिळते आहे.
RBI च्या माहितीनुसार 1 सप्टेंबरपर्यंत 93 टक्के नाेटा परत आल्या आहेत. त्यामुळे 2000 हजार रुपयांच्या नाेटा जमा किंवा बदलण्याची मुदत वाढवण्याची शक्यता कमीच आहे. तरी देखील RBI नाेटा बदलून देण्याबाबत काही नियम आणि अटी घालून कायदेशीर प्रक्रिया राबवू शकतात. त्यानुसार 30 सप्टेंबरनंतर RBI व्यवहाराच्या बाबतीत दाेन हजार रुपयांची नाेट वापरण्यास बंदी घालू शकते. परंतु व्यक्तींना बॅंक खात्यांमध्ये नाेट जमा करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
RBI बॅंकने 30 सप्टेंबरनंतर फक्त आघाडी आणि ॲड्रेस प्रूफ सादर करून दाेन हजार रुपयांच्या नाेटा बदलण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. RBI ने चलनातून 2000 रुपयांच्या नाेटा काढून घेताना 30 सप्टेंबरपर्यंत काेणत्याही बॅंकेतून 20 हजार रुपयांच्या मर्यादेसह गुलाबी नाेटा बदलण्याची परवानगी दिली हाेती.